ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू! आधी वाटले ट्रकने उडवले मात्र सीसीटिव्ही फुटेजमधून समोर आले धक्कादायक सत्य! खामगाव तालुक्यातील घटना
Updated: Sep 15, 2022, 07:53 IST

खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मरण एवढे स्वस्त झाले की काय इतपत आत्महत्यांच्या घटना सातत्याने जिल्ह्यात वाढत आहे. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून जगाचा निरोप घेण्याची मानसिकता बनने हा सगळ्यांसाठीच चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. आधी वाटले की त्याला ट्रकने उडवले असावे मात्र रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दुकानाच्या सीसीटिव्ही फुटेज मधून धक्कादायक सत्य समोर आले. तरुणाने ट्रकखाली उडी घेऊन आत्महत्येचा हा नवीन मार्ग अवलंबिल्याचे समोर आले. काल, १४ सप्टेंबरच्या सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
शाहबाज अब्दुल रफिक असे मृतुक तरुणाचे नाव असून तो पिंपळगाव राजा येथील कांदा व्यापारी रफिक भाई यांचा मुलगा होता. पिंपळगाव राजा - खामगाव रस्त्यावरील स्टेट बँकजवळ तो बराच वेळ उभा होता. दरम्यान त्या रस्त्याने एक कंटेनर जात होते. कंटेनरचा पुढील भाग समोर गेल्यानंतर त्यांनी मागील बाजूच्या चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली. यावेळी उपस्थितांनी एकच धाव घेत त्याला तातडीने उपचारासाठी हलविले मात्र त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अपघातानंतर सगळ्यांना त्याला कंटेनरने चिरडले असावे असा असे वाटले मात्र रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दुकानातील सीसीटिव्ही फुटेज मध्ये त्याने चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.