भरधाव एसटीने दुचाकीला उडवले; चिखलीचा तरुण जागीच ठार; चिखली शहरातील घटना
Dec 20, 2022, 10:19 IST

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव एसटी ने दुचाकीला उडवल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. चिखली शहरातील चिखली देऊळगाव राजा रस्त्यावरील रामा ट्रॅक्टर शोरुम समोर काल, १९ डिसेंबरच्या रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.
सतिश परमेश्वर आव्हाळे (३५, रा. सायाळा,ता.सिंदखेडराजा, हमु सहारा पार्क,चिखली) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. सतिश आव्हाळे हे चिखली येथे एका कंपनीत ऑपरेटर म्हणून नोकरीला होते. काम आटोपून घराकडे जात असताना छत्रपती संभाजीनगर वरून चिखलकडे येणाऱ्या चिखली आगाराच्या एसटी बसने आव्हाळे यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जबर होती की आव्हाळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पसार होत चिखली पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. चिखली पोलीस याप्रकरणी बसचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.