भरधाव कंटेनरने मोटरसायकलला उडवले! दवाखाना आटोपून घराकडे जाणाऱ्या युवकाचा मृत्यू! १ जण गंभीर! चिखलीच्या एमआयडीसीजवळील घटना

 
bm bh
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  दवाखाना आटोपून घराकडे परत जात असताना मोटारसायकल ला कंटेनरने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला. आज, २० जुलैच्या संध्याकाळी मेहकरफाट्या जवळील हॉटेल हंडीबाग जवळ हा भीषण अपघात झाला.
अनिल दामोधर गवई (३४) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असून भिकाजी उकर्डा गवई(२९)  हा गंभीर जखमी झाला. दोघेही चिखली तालुक्यातील खैरव येथील राहणारे आहेत. दोघे चिखलीला दवाखान्याच्या कामासाठी आले होते. मोटारसायकलने संध्याकाळी घराकडे परत असताना एमआयडीसी जवळ असणाऱ्या हॉटेल हंडीबाग समोर भरधाव कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात अनिल गवई घटनास्थळी ठार झाला असून भिकाजी गवई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.