पुलाच्या भिंतीला कार धडकली! काकू - पुतण्याचा मृत्यू; भाऊबीज आटोपून सासरी जात होते! धाड जवळील घटना

 
nhhg
धाड ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव कार पुलाच्या भिंतीला धडकल्याने कारमधील काकू - पुतण्याचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. बुलडाणा - छत्रपती संभाजीनगर मार्गावरील  म्हसला खुर्द गावाजवळ ३० ऑक्टोबरच्या रात्री अपघात झाला. अपघातात ठार व जखमी झालेले बुलडाणा तालुक्यातील देउळघाट येथील रहिवाशी आहेत.

सुनिता संतोष पन्हाळे (२५) व आकाश प्रकाश पन्हाळे(२२) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत तर सुनीता यांचे पती संतोष पन्हाळे व त्यांची दोन मुले विशाल व पूजा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बुलडाणा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. सुनिता भाऊबीजेसाठी माहेरी जाफ्राराबाद तालुक्यातील चापनेर येथे गेल्या होत्या. दरम्यान ३० ऑक्टोबरला त्यांचे पती संतोष पुतण्या आकाश त्यांना घेण्यासाठी गेले होते. चापनेर वरून ते आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी भोकरदन तालुक्यातील काळेगावला गेले होते. तिथून रात्री देऊळघाटकडे परत येत असताना हा अपघात झाला.