"ते" अर्भक जमिनीत पुरणाऱ्या मुलीच्या भावाला व बापाला अटक ! मलकपुरात १७ वर्षीय मुलगी बलात्कारातून राहिली होती गर्भवती..! बदनामीच्या भीतीपोटी केलेले कांड अंगलट आले

 
yhgh
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १७ वर्षीय मुलीला रस्त्यात अडवून तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील माकनेर शिवारात घडली होती. घरच्यांनी बदनामीच्या भीतीपोटी प्रकरण दाबल्यानंतर पीडित मुलगी प्रेग्नेंट राहिले. २६ नोव्हेंबरला तिने अर्भकाला जन्म दिला,ते अर्भक जमिनीत पुरण्यात आले. दरम्यान याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांसह भावाला मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

मलकापूर तालुक्यातील माकनेर येथे घडलेला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी बदनामीच्या भीतीपोटी प्रकरण दाबण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आहे. बलात्कार प्रकरणानंतर मुलगी गर्भवती राहिली, त्यातून आणखी बदनामी होईल म्हणून अर्भक जमिनीत पुरले. अज्ञात व्यक्तीने या प्रकरणाची तक्रार चाईल्ड वेलफेअर ट्रस्ट कडे केली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडीस आला. पोलिसांनी पुरलेले अर्भक पुन्हा जमिनीतून उकरले असून त्याच्या तपासण्या झाल्यानंतर ते पुन्हा पुरल्या जाणार आहे.

दरम्यान पीडित मुलीच्या जबाब नोंदविल्यानंतर दोन अज्ञात व्यक्ती विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय पीडित मुलीच्या वडील आणि भावाने ते अर्भक जमिनीत गाडल्याची माहिती समोर आल्याने तिच्या वडिलांना व भावाला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.