शाळा, कॉलेज मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्या लफडे बहाद्दरांना आता रट्टे! बुलडाणा विभागात एसपींच्या आदेशाने दामिनी पथक सक्रिय; मुलींनो, पालकांनो "हा" मोबाईल नंबर तुमच्याकडे सेव्ह ठेवाच

दामिनी पथकाने त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. श्री, संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी सागवन, राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी सागवन, अनुराधा कॉलेज चिखली,जवाहर उर्दू हायस्कूल मोताळा, राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा चिखली, शिवाजी सायन्स अँड आर्ट कॉलेज चिखली, जिजामाता महाविद्यालय बुलडाणा, भारत विद्यालय बुलडाणा, एडेड हायस्कूल बुलडाणा यासारख्या शाळा कॉलेज मध्ये दामिनी पथकाने भेटी दिल्या आहेत. दामिनी पथकाबद्दल विद्यार्थी, विद्यार्थिना माहिती देण्यात आली असून शाळा ,कॉलेज मध्ये विद्यार्थिनींसाठी तक्रार पेटी लावण्याच्या सूचना प्राचार्यांना देण्यात आल्या आहेत.
बुलडाणा केसापुर एसटी बसमध्ये ७ ऑक्टोबर रोजी मुलींशी टवाळखोर वागणाऱ्या तीन टवाळखोरांना सुद्धा दामिनी पथकाने आपला हिसका दाखवला. शहर व ग्रामीण भागातील शाळा ,कॉलेज परिसर, बसस्थानक परिसर, शिकवणी वर्गाचा परिसर या ठिकाणी दामिनी पथकाने पेट्रोलिंग सुरू केले आहे. महिला, मुलींना अशी कोणतीही अडचण आल्यास 9067286510 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय 112 व महिला हेल्पलाईन क्रमांक 1091 या क्रमांकावर सुद्धा संपर्क साधता येईल.