दुचाकी चोरींची धूम !‘मॉडीफाय’चा फंडा! एका आरोपीसह २ वाहने जप्त! सिंदखेडराजा तालुक्यातील कारवाई

 
jyuh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चोरीच्या दुचाकींचा नेमका प्रवास कोणत्या दिशेने जातो हे पोलिसांसमोर आव्हानच आहे. जिल्ह्यात बाईक चोरीची धूम सुरू आहे.चोरीच्या दुचाकींचा एक मार्ग ‘मॉडीफाय’ करण्याकडे जात असतो. दुचाकीच्या नंबरप्लेट, इंजिन नंबर, चेसीस नंबरची तपासणी केल्यास गुन्हे उघडकीस येतात. सिंदखेडराजा हद्दीत 8 डिसेंबरला असा गुन्हा उघडकीस आला. आरोपी दीपक घुले कडून होंडा यूनिकॉन व एक् स्कुटी अनुक्रमे 90 हजार,45 हजार रुपये किंमतीच्या दोन गाड्या विना नंबर चेचीस च्या आधारे आरोपीसह जप्त करण्यात आल्या. दोन गाड्यांपैकी होंडा यूनिकॉर्न करमाळा, औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आली.

चोरीच्या दुचाकीचा तपास करण्याचे जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यासमोर आव्हान आहे. तर, दुसरीकडे चोरीच्या काही दुचाकी ‘मॉडीफाय’ करून वापरात आणल्या जात आहेत. ‘मॉडीफाय’ केलेल्या दुचाकी नव्‍याकोऱ्या दिसत असल्यामुळे त्याची तपासणी होत नाही. वास्तविक ‘मॉडीफाय’ दुचाकीची नंबरप्लेट व चेसी नंबर, इंजिन नंबर याची पडताळणी केल्यास दुचाकीचा इतिहास समोर येतोय. जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. किमान दोन तरी दुचाकी दररोज लांबवल्या जातात. चोरीच्या दुचाकी अन्य जिल्ह्यात किंवा राज्यात जाऊन विकल्या जातात. बऱ्याचदा दुचाकीचे सुटे भाग करून त्याची विक्री होते. दुचाकी चोरीचे प्रकार आणि चोऱ्या उघडकीस येण्याचे प्रमाण पाहिले तर त्यात मोठी तफावत आहे. त्यामुळे एवढ्या चोरीच्या दुचाकी जातात तरी कोठे? असा प्रश्‍न पडतो. मात्र पोलिसांनी मनावर घेतली की चोरीच्या दुचाकींचा सुगावा लागतो. जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 8 डिसेंबरला एचसी ओमप्रकाश सावळे, अमोल भुतेकर, एनपीसी दिगंबर कपाटे,पीसी दीपक वायाळ पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांनी सिंदखेड राजा हद्दीतील ग्राम चिंचोली जहागीर येथे धाड मारून आरोपी दीपक नारायण घुले (23) कडून होंडा यूनिकॉर्न गाडी व एक स्कुटी जप्त केली. होंडा यूनिकॉन ही करमाड जिल्हा औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आली आहे. ही वाहने चेचिस नंबरच्या आधारे जप्त करण्यात आली आहे. अरबी बुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गाडी चोरीला गेल्यास तक्रार करा..

गाडी चोरीला गेल्यावर लोक नेहमी एक मोठी चूक करतात. ते पोलिसांना इन्फॉर्म करण्याऐवजी स्वत:च गाडी शोधण्यासाठी कित्येक तास बरबाद करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, गाडी चोरी गेल्यावर जर लगेच पोलिसांना इन्फॉर्म केले नाही, तर तुम्ही आयुष्यभरासाठी मोठ्या संकटात पडू शकता. जर तुमची गाडी चोरी झाली, आणि चोरी करणाऱ्या व्यक्तीने एखादा अक्सिडेंट केला तर लाखो रुपयांचा भुर्दंड गाडी मालकाला सोसावा लागतो.याशिवाय जर तुमची गाडी चोरी झाली आणि चोरी करणारी व्यक्ती तुमच्या गाडीचा वापर एखाद्या गुन्हेगारी कृत्यासाठी (उदा. हत्या, चोरी, दरोडा, अक्सिडेंट वा आणखी काही) करत असेल तर पोलिस सर्वात आधी गाडीच्या मालकालाच पकडतात. सर्व कलमे गाडी मालकाविरुद्ध लावली जातात. अशा वेळी तुम्हाला पोलिसांसमोर हे सिद्ध करावे लागते की, तुमची गाडी चोरी झाली होती. जर तुम्ही हे सिद्ध करू शकला नाहीत, तर तुम्ही नक्कीच संकटात सापडू शकता.