दोन एकर शेतीसाठी जन्मदात्या आईला पाजले विष! गावकऱ्यांना म्हणाला, हिला इथेच मरू द्या, दवाखान्यात नेऊ नका,मी जेल भोगीन!नांदुरा तालुक्यातील धक्कादायक घटना"

 
borakhedi
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन एकर शेती माझ्या नावावर करून दे असे म्हणत जन्मदात्या आईला लेकानेच विष पाजल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. नांदुरा तालुक्यातील गोसिंग येथे ही घटना घडली असून बोराखेडी पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

जयवंताबाई लक्ष्मण सावंत (६५) या  गोसिंग, ता.नांदुरा येथे राहतात. पोळ्याच्या दिवशी रात्री ८ वाजता त्या घरात जेवण करत होत्या. त्याचवेळी त्यांचा मुलगा प्रभाकर लक्ष्मण सावंत हा दारू पिऊन घरी आला. वडिलांनी भाऊ विलास याल दिलेली २ एकर शेती माझ्या नावावर करून दे असे म्हणत त्याने त्याच्या आईशी वाद घातला.

जमीन माझ्या नावावर करून दिली नाही तर तुला आत्ताच एनड्रेस पाजीन, तुला आजच मारून टाकीन असे म्हणत प्रभाकर ने त्याच्या आईला खाली पाडले. त्याने खिशातून आणलेली एनड्रेस या विषाची बाटली आईच्या तोंडात ओतली. जयवंताबाईने आरडा ओरड केल्यानंतर त्यांची मुलगी धावत आली  मात्र तेव्हा प्रभाकर दारात हातात काठी घेऊन उभा होता.

आईला दवाखान्यात नेऊ का, इथेच मरू द्या, मी जेल भोगील असे प्रभाकर म्हणत होता. मुलीने गावातील एका गाडीत टाकून तिच्या आईला बुलडाणा येथे दवाखान्यात आणले असून तिथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी रुग्णालयात येऊन जयवंताबाईचा जबाब नोंदवून प्रभाकर विरुद्ध गुन्हा दाखल केला.