म्हणे बँक मॅनेजरनी बोलाविले..! म्हाताऱ्या दांपत्याला ५० हजारांनी लुटले; एलसीबीने आरोपीच्या आवळल्या मुसक्या!

 
ikungt

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील डोणगांव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत वयोवृद्ध जोडप्याकडून ग्रामीण कुटा बचत गटातून काढलेली ५० हजार रुपयांची रक्कम लुबाडल्याची घटना काल रात्री समोर आली. सदर आरोपीच्या मुस्क्या बुलडाणा एलसीबीने आवळल्या. दानिश अकील शेख (रा.रोहिनखेड ता. मोताळा) असे आरोपीचे नाव आहे.

डोणगांव स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दामोदर पुंजाजी खंदारे व पत्नी हे दोघे ग्रामीण कुटा बचत गटाकडून मिळाले पैसे काढण्यासाठी १४ डिसेंबर रोजी गेले होते.   त्यावेळी बॅंकेच्या शाखेत दानिश अकील शेख (रा.रोहिनखेड ता. मोताळा) हजर होता.त्यावेळी  खंदारे यांनी कॅश काऊंटरवरुन ५० हजार रुपये रोख काढले व बॅंकेच्या बाहेर पडले. त्यावेळी आरोपी दानिश अकील शेख हा त्यांच्या पाठीमागे जाऊन 'तुम्हाला बॅंक मॅनेजरनी बोलावले' असे सांगून या वयोवृद्ध जोडप्यांना बॅंकेत बोलावून त्यांना गप्पा गोष्टींमध्ये गुंतवून त्यांच्या जवळील नगदी ५० हजार रुपये घेऊन पोबारा केला.

दरम्यान दामोदर खंदारे व त्यांच्या पत्नीने डोणगांव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.मात्र डोणगांव पोलिसांकडून आरोपी शोधण्यात यश आले नाही. मात्र बुलडाणा एलसीबीने अवघ्या  चार दिवसात आपली तपासचक्र फिरवून फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख बळीराम गिते यांच्या आदेशानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया मधिल सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. आरोपी दानिश अकील शेख रा.रोहिनखेड तालुका मोताळा या आरोपीला पो.उप नि.श्रीकांत जिंदमवार,पो. कॉन्स्टेबल दिनेश बकाले,अजीस परसुवाले,गजानन गोरले, सरिता वाकोडे, मधुकर रगड,राजू आडवे, कैलास ठोंबरे यांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली.