१७ वर्षीय मुलीला रस्त्यात अडवून दोघांनी इज्जत लुटली! बदनामीच्या भितीपोटी घरच्यांनी सगळ लपवलं, पण बलात्कारातून प्रेग्नेंट राहिल्यावर सारेच हादरले! अर्भकाला जमिनीत पुरल्यावर सगळ्या गावात बोंब;

मलकापूर तालुक्यातील धक्कादायक घटना! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 
kraim
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ती १७ वर्षांची...ऑगस्ट महिन्यात तिला अज्ञात दोघांनी अडवले, एकाने हात पाय धरुन दुसऱ्याने तिची इज्जत लुटली. दोघांनीही आळीपाळीने बलात्कार केला. दोघे आरोपी पसार झाल्यावर ती कशीबशी घरी आली.घरच्यांना तिने घडलेला घटनाक्रम सांगितला पण बदनामीच्या भीतीपोटी घरचे गप्प बसले. मात्र "त्या" बलात्कार प्रकरणातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर सारेच हादरले. २६ नोव्हेंबरला पीडित मुलीने एका अर्भकाला जन्म दिला. ते अर्भक एका शेतात पुरल्यावर आता पुरावे नष्ट झाले असेच तिच्या घरच्यांना वाटले पण...नंतर सगळच चव्हाट्यावर आल. मलकापूर तालुक्यातील माकनेर गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय...!

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गावातीलच एका अज्ञात व्यक्तीने याप्रकणाची तक्रार चाईल्ड वेलफेअर ट्रस्टकडे केली. त्यानंतर चाईल्ड वेलफेअर ट्रस्ट ची टीम गावात दाखल झाली. पिडीत अल्पवयीन मुलीला बुलडाण्यात आणल्यानंतर तिचा जबाब नोंदविण्यात आला. तिने घडलेला घटनाक्रम सांगितल्यानंतर मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात "त्या" दोन बलात्कार करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गावात पोहचून जमिनीत पुरलेले अर्भक पुन्हा बाहेर काढले.  त्याच्या पूर्ण तपासण्या केल्यानंतर ते अर्भक पुन्हा जमिनीत पुरण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
   
अनेक प्रश्न...!

 दरम्यान पीडित मुलीने २६ नोव्हेंबरला अर्भकास नैसर्गिक जन्म दिला की त्याला बाहेर काढण्यात आले? अर्भक मृत होते की जिवंत? जिवंत असेल तर त्याचा खून करून त्याला पुरण्यात आले का ? बलात्कार करणारे आरोपी कोण होते? असे अनेक प्रश्न याप्रकणानंतर उपस्थित झाले असून पोलिस त्याचा तपास करीत आहेत.