भयंकर विकृती.! सोयाबीनची सुडी नजरेत भरली, जळक्या माणसाने ताडपत्रीसहित पेटवली! लोणार तालुक्यातील चिखला येथील घटना

 
sudi
बिबी( ऋषी दंदाले: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काही माणसांना दुसऱ्याचं चांगल झालेलं दिसत नाही. ही जळक्या वृत्तीची माणसं विकृत असतात.लोणार तालुक्यातील चिखला येथे एका शेतकऱ्यांची सोयाबीनची सुडी एका जळक्या विकृत माणसाच्या नजरेत भरली आणि त्या विकृत माणसाने शेतकऱ्याची उभी सुडी पेटवून दिली. बिबी पोलीस ठाण्यात याप्रकरणी शेतकऱ्याने तक्रार दिली आहे.

चिखला येथील  शेतकरी कमल मुरलीधर इंगळे(५८) यांनी याप्रकरणाची तक्रार दिली आहे. त्यांनी त्यांच्या साडेतीन एकर शेतातील सोयाबीनची सुडी लावून ताडपत्री ने झाकून ठेवली होती. या सोयाबीन पासून त्यांना २२ ते २५ क्विंटल सोयाबीन चे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र ९ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात जळक्या वृत्तीच्या माणसाने ही सुडी पेटवून दिली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण करीत आहेत.