भीषण अपघात! कंटेनरने दुचाकीला उडवले! तरुणांचा मेंदू बाहेर पडला, जागीच ठार! बुलडाणा शहरातील घटना

 
apg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बुलडाणा शहरातील रविकांत तुपकर यांच्या चिखली रोडवरील जनसंपर्क कार्यालयाजवळ आज, २५ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास हा अपघात झाला

सुमेध काळे (२२) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून तो  बुलडाणा शहरातील भीमनगर भागातील राहणारा आहे. तो आईवडिलांना एकुलता एक होता. सुमेध दुचाकीने चिखलीकडून बुलडाण्याकडे जात होता. दरम्यान चिखली रोडवरील रविकांत तुपकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ  पाठीमागून येणाऱ्या  कंटेनरने दुचाकीला धडक दिली.

अपघात एवढा भीषण होता की सुमेधचा मेंदूच बाहेर पडला.  हाकेच्या अंतरावर असलेल्या शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचा चालक घटनास्थळावर कंटेनर उभा करून पसार झाला. कंटेनर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.