भीषण अपघात! कार लक्सरीवर आदळली; मुलाच्या ऍडमिशन साठी औरंगाबादला गेलेल्या वकीलांवर परततांना काळाचा घाला!; ५ जण जखमी! बेराळा फाट्यारील घटना!

 
edrftgy
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुलाच्या ऍडमिशनच्या कामासाठी औरंगाबादला  गेलेल्या वकिलांचा बुलडाणा येथे परत येत असताना चिखली तालुक्यातील बेराळा फाट्यावर अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने वकिलांची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या लक्सरी कारवर आदळली. त्यामुळे लक्सरी देखील बाजूच्या शेतात उलटली. या विचित्र अपघात बुलडाणा येथील  ॲड बी.के. सानप हे जागीच ठार झाले तर त्यांचे सहकारी ॲड भागीले जखमी झाले. काल, १४ मे च्या रात्री अकराला हा अपघात झाला.

बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयात काम करणारे ॲड बी.के. सानप हे त्यांच्या मुलाच्या ऍडमिशनच्या कामासाठी शनिवारी सकाळी औरंगाबादला गेले होते. त्यांच्यासोबत ॲड भागिले हेसुद्धा होते. औरंगाबादचे काम आटोपून त्यांच्या कारने ते बुलडाणा येथे परत येत होते. दरम्यान बेराळा  फाट्याजवळ कार चालवणारे ॲड सानप यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डीव्हायडर तोडून विरुद्ध चिखलीवरून पुण्याकडे जाणाऱ्या लक्सरीवर आदळली.

यामुळे लक्सरी बाजूच्या शेतात पलटल्याने लक्सरी मधील ५ प्रवाशी जखमी झाले. ॲड सानप यांच्या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात ॲड सानप हे जागीच ठार झाले. कारमध्ये फसलेल्या ॲड भागीले यांना  क्रेन लावून दरवाजा तोडून बाहेर काढावे लागले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलीसांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू केले. याप्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.