भीषण अपघात! मालवाहू ॲपे मोटरसायकलला अपघात, दोघे ठार! चिखली शहरातील घटना

 
efrgh
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मालवाहू ॲपे आणि मोटारसायकलच्या अपघातात दोन जण ठार झाले. काल ,२५ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

मालवाहू ॲपे आणि मोटारसायकलचा चिखली शहरातील रेणुका पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील नारायण लक्ष्मण धनवटे व चिखली येथील विठ्ठल गोविंदा पिटकर या दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. चिखली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तपास चिखली पोलीस करीत आहेत.