भीषण अपघात! उभ्या ट्रकवर मोटारसायकल आदळली; दोघे जागीच ठार,एक गंभीर! हिवरा आश्रम जवळील घटना

 
accident
मेहकर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव मोटारसायकल उभ्या ट्रकवर  आदळली. या अपघात दोन जण जागीच ठार तर एक गंभीर झाल्याची घटना काल ६ मे च्या रात्री चिखली मेहकर रोडवरील हिवरा आश्रम जवळ घडली.

 मेहकर तालुक्यातील नागझरी बु  येथील रवी रामभाऊ गवई (३४),रमेश सुखदेव गवई(४२) व अरुण भगवान गवई (३०) तिघे मोटारसायकलने  हिवरा आश्रम कडे जात होते. दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून त्यांची मोटारसायकल आदळली. या अपघातात रवी गवई आणि रमेश गवई हे जागीच ठार झाले भगवान गवई गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गंभीर जखमी भगवान गवई याला आधी मेहकर व नंतर औरंगाबाद येथे हलविण्यात आले. मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आज, ७ मे रोजी अपघातात ठार झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.