म्हणे मला तुझ्यासोबत....नाहीतर तुझ्या नवऱ्याला ,पोराला मारून टाकीन! ३० वर्षीय विवाहितेवर घरात घुसून बलात्कार; नांदुरा तालुक्यातील धक्कादायक घटना

 
kraim
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३० वर्षीय विवाहितेला चाकूचा धाक व नवऱ्याला आणि पोराला मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बोराखेडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नांदुरा तालुक्यातील एका गावात हा प्रकार समोर आलाय. बोराखेडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी विवाहितेने तक्रार दिली आहे.

पिडीत विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. विवाहितेचा पती घरी नसतांना आरोपी जयविजयसिंग जाधव हा तिच्या घरात घुसला . चाकूचा दाख दाखवून त्याने शारीरिक संबधाची मागणी त्याने केली. तिने नकार दिला असता तुझ्या नवऱ्याला आणि पोराला जीवाने मारून टाकीन अशी धमकीही त्याने दिली. त्यानंतर तो सातत्याने तिच्यावर अत्याचार करीत होता. अखेर तिच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने तिने बोराखेडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.