पाठलाग करून तवेरा वाहन पकडले! गोवंश तस्करीचा निष्कर्ष; सिंदखेडराजा गुन्हे शोध पथकाची कारवाई

 
hgdb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल रात्री एका संशयास्पद वाहनाचा पाठलाग करून तवेरा कंपनीचे वाहन चिखली परिसरातील गवळीपुरा येथून सिंदखेडराजा गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या तवेरा वाहनात जनावरांचे शेण व दोरी आढळून आल्याने गुरांच्या तस्करीचा निष्कर्ष काढल्या जात आहे. पोलिसांनी पाठलाग केला असता, आरोपी वाहन टाकून पडून जाण्यात यशस्वी झाला.

 जिल्ह्यातून गोवंशाची अवैध वाहतूक होणे, काही नवीन बाब नाही. कत्तलीसाठी नेत असलेले अवैध गोवंश पोलिसांनी व बजरंग दलाने पकडल्याच्या अलीकडे घटना समोर आल्या आहेत. गोवंश अवैध वाहतुकीच्या संशयावरून काल रात्री डिव्हिजन पेट्रोलिंग दरम्यान सिंदखेड राजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एम एच ४ जीडी ६७५७ आहे .

नंबर प्लेट अस्पष्ट असलेल्या तवेरा वाहनावर संशय आला. सदर वाहनाला राऊतवाडी च्या समोर जाऊन वाहन थांबविण्याचा इशारा देण्यात आला. परंतु चालकाने या उलट वाहन परत चिखलीकडे वळविले. दरम्यान पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला असता, चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन गवळीपुरा परिसरात उभे करून तो फरार झाला. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता या वाहनांमध्ये गुरांचे शेण व दोरी आढळून आली. त्यामुळे वाहन चालक व त्याचे साथीदार या वाहनाचा जनावरांच्या वाहतुकीकरिता वापर करीत असावे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी कलम २०७  मोटर वाहन कायदा अन्वये पुढील कारवाईसाठी वाहन चिखली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई हेड कॉन्स्टेबल ओमप्रकाश साळवे, डिगांबर कपाटे, दीपक आयाळ, मनोज खरडे यांनी केली.