घर बांधकामासाठी रेती घेताय? आधी खामगावचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव काय म्हणताय ते वाचा..!

 
yufg
शेगाव:(ज्ञानेश्वर ताकोते) स्थानिक व तालुक्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सध्यस्थितीमध्ये शेगाव तालुक्यातील कोणत्याही रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही, त्यामुळे चोरटया मार्गाने रेतीचे उत्खनन व वाहतुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तालुक्यातील नागरीकांना किंवा बांधकाम व्यावसायीकांना बांधकामासाठी किंवा इतर कामासाठी वाळूची आवश्यकता असल्यास आपण वैधरित्या वाहतुक केलेल्या वाळुचीच खरेदी करावी व वाळू खरेदी करताना  वाहतुकदाराकडुन शासनाने अधिकृतरित्या दिलेल्या वाहतुक पासची मागणी करावी. व जेवढी वाळू आपण खरेदी केलेली आहे.तेवढया ब्रासची वाहतुक पासेस (रॉयल्टी) जपुन ठेवाव्या. 

 आपण वापर करीत असलेल्या वाळूबाबत किंवा आपले घराचे किंवा इतर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावर वाळू किंवा वाळूसाठा आढळुन आल्यास व त्याबाबत महसूल विभागाच्या पथकामार्फत चौकशी अथवा तपासणी केली असल्यास त्यावेळी आपण वाळू वाहतुकदाराकडुन पुरविण्यात आलेल्या वाहतूक पास रॉयल्टी सादर करावी. आपण वाहतूक पास / रॉयल्टी टि.पी. सादर न केल्यास आपण वापर करीत असलेली वाळू किंवा वाळूसाठा हा अवैध आहे. असे समजुन आपणाविरूध्द महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी.

 तालुक्यातील सर्व नागरीकांनी वैधरित्या वाहतुक केलेल्या वाळुचाच वापर आपल्या बांधकाम किंवा अन्य कामासाठी करावा व दंडात्मक कार्यवाही तसेच कायदेशिर कार्यवाहीपासुन आपण आपला बचाव करावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी, खामगाव श्री. राजेंन्द्र जाधव व तहसिलदार शेगाव श्री. समाधान सोनवणे यांनी केले आहे.