समृद्धी महामार्गावर स्विफ्ट कारचा चुराडा! तिघांचा दुर्दैवी मृत्यू 2 जखमी!शिवनीपिसा नजीक भीषण अपघात

 
Gfji
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  आज,१६ जानेवारी रोजी बीबी ते शिवनीपिसा गावाजवळ झालेल्या स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात तिघांणा प्राण गमवावे लागले आहेत. तर २ जण जबर जखमी झाले आहेत. हा अपघात एका कारणे दुसऱ्या कारला मागून धडक दिल्याने झाल्याची माहिती आहे. गौरव खडसने , सनवी सोनटक्के आणि अमित खेरकर अशी मृतकांची नावे असून तिघेही नागपूरचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

एम एच 49 बी आर 60 82 ही स्विफ्ट डिझायर कार काही अंतरावर पुढे जात असताना एम एच 32 44 90 क्रमांकाची मारुती सुझुकी या कारमध्ये अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, या कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचाराला नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर तत्काळ महामार्ग पोलीस पीएसआय गजानन उज्जैनकर, गोविंदा उबरहंडे, हरी ओम काकडे, विठ्ठल काळुसे, संदीप किरके, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान नितीन पवार, जयकुमार राठोड, क्यूआरव्ही कर्मचारी अविनाश मकासरे, रुस्तुम कुट्टे यांनीजखमींना रुग्णालयात दाखल केले..

 बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 11 डिसेंबर रोजी जाले. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नागपूर ते शिर्डी प्रवास करत या मार्गाची चाचणी केली होती. या संपूर्ण महामार्गाची बांधणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीने केली आहे. असं असतांना हा महामार्ग वाहतुकीकरता सुरु झाल्यावर या मार्गावरील पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप होत आहे.