सुखदेव भोरकडे झाले धामणगाव बढेच्या पोलीस स्टेशनचे कारभारी; चंद्रकांत ममताबादेंची बदली

 
dhamangav
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापना मंडळाची आज,३१ डिसेंबरला बैठक झाली. या बैठकीत धामणगाव बढे येथील ठाणेदार पदी सपोनि सुखदेव भोरकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 आतापर्यंत सपोनि चंद्रकांत ममताबादे हे धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार होते. त्यांची बदली करण्यात आली असून त्यांना कुठे पाठवणार याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे.  नव्याने धामणगाव  बढेचे ठाणेदार झालेले सुखदेव भोरकडे हे आधी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. जिल्ह्याचे एसपी सारंग आवाड यांच्या आदेशाने सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सत्र सुरू आहे.

काल, एलसीबीचा प्रभार अशोक लांडे यांच्याकडे देण्यात आला. बळीराम गीते यांना बोराखेडीचे ठाणेदार बनवण्यात आले तर जळगाव जामोद च्या ठाणेदार पदी पोलीस निरीक्षक झांबरे यांना नियुक्ती देण्यात आली. दरम्यान आतापर्यंत बोराखेडी पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळणारे राजेंद्र पाटील आणि जळगाव जामोद चा कारभार सांभाळणारे सुनील अंबुलकर यांना अद्याप नवी जबाबदारी देण्यात आलेली नाही.