खळबळजनक! मलकापूर पांग्रा पेट्रोल पंपावर दरोडा: कुऱ्हाड, चाकूचा धाक दाखवून पाच लाख रुपये घेऊन दरोडेखोर पसार; सुलतानपुरच्या पेट्रोलपंपावर राडा,

दरोड्याचा प्रयत्न फासला; कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांची गाडी फोडली..!
 
juhyg
मलकापूर पांग्रा( अमोल साळवे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा परिसरातील  पेट्रोल पंपावर चोरट्यांनी संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास दरोडा टाकला.यावेळी  दरोडेखोरांनी कामगारांना मारहाण करत चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवत रोकड लुटली . दरडोखोरांनी पेट्रोल पंपाच्या केबिनचा दरवाजा तोडून पाच लाख रुपये व कामगारांचे मोबाईल लंपास केले..दरम्यान या घटनेनंतर काही वेळातच दरोडेखोरांनी सुलतानपूर येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्न केला. या वेळी पंपावरील कर्मचारी आणि दरोडेखोरांत हातापाई झाली. कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांची गाडी फोडल्याने दरोडेखोर गाडी घटनास्थळी ठेवून पसार झाले.

 मलकापूर पांग्रा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आल्याची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे  कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून त्या आधारे दरोडेखोरांचा युद्ध पातळीवर शोध घेण्यात येत आहे..

नेमकं काय घडलं? 

  मलकापूर पांग्रा परिसरात असलेला श्रीयान पेट्रोल पंपावार रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान वाहतुकीची वर्दळ कमी असल्यामुळे कामगार ऑफिसमध्ये आराम करत होते. याच दरम्यान पेट्रोल पंपावर चार दरोडेखोर आले व कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली तर एका दरोडेखोराने कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न केला.. याच दरम्यान ऑफिस मधील आतील भागातील दरवाजा फोडून पाच लाख रुपये लुटून चोरटे पसार झाले..
   
 सुलतानपुरात राडा..

दरम्यान मलकापूर पांग्रा येथील घटनेनंतर काही वेळातच दरोडेखोरांनी सुलतानपूर गाठले. तिथल्या कालिंका पेट्रोलपंपावर दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याच्या प्रयत्न केला. मात्र पंपावरील कर्मचारी आणि दरोडेखोरांत झटापट झाली. यावेळी एका कर्मचाऱ्यावर दरोडेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार केले. कर्मचाऱ्यांनी देखील दरोडेखोरांची गाडी फोडल्याने दरोडेखोर गाडी घटनास्थळी ठेवून पसार झाले. दरम्यान दरोडेखोरांचे धागेदोरे हाती लागले असून लवकरच दरोडेखोर आमच्या ताब्यात असतील अशी माहिती साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिली.