धक्कादायक! गतिमंद महिलेवर बुलडाण्याच्या "गोट्या"चा बलात्कार; महिला ७ महिन्यांची प्रेग्नेंट; गोट्या पोलिसांच्या ताब्यात

 
kraim
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गावात फिरणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा तालुक्यातील एका गावात समोर आलाय. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी गोट्या बाहेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित ३५ वर्षीय महिला गतिमंद असल्याने गावात इकडे तिकडे फिरत असते. आरोपी वासनांध गोट्याची नजर तिच्यावर पडली. तिच्या असहायतेचा फायदा घेऊन गोट्या ने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. त्यातून पीडित महिला गर्भवती राहिली.  गावातील काही नागरिकांनी त्या महिलेला बुलडाणा येथील सखी वन स्टॉप सेंटर येथे दाखल केले. तिथे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर बुलडाणा येथील भरोसा सेल येथे पीडित महिलेचा जबाब नोंदविण्यात आला, त्यावेळी तिने गोट्याचे नाव सांगितले. त्यानंतर बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी गोट्या बाहेकर ला अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सदानंद सोनकांबळे करीत आहेत.