धक्कादायक..! आई वडील कामावर गेले अन् घरी असलेल्याला चिमुकल्याचा जीव गेला! नांदुऱ्यातील मन हेलावून टाकणारी घटना

 
nandura
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  आई वडील मजुरीसाठी बाहेर गेले. त्याच वेळी दोन्ही मुले घरी खेळत होती. खेळता खेळता एकाला दरवाजाला लावलेल्या पडद्याचा फास लागला अन त्याचा जागीच मृत्यू झाला. नांदुरा शहरातील वॉर्ड न २ मध्ये काल २२ सप्टेंबर रोजी ही मन हेलावून टाकणारी घटना घडली.

प्रेम कैलास कांबळे(१२) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे आई वडील काल दुपारी मजुरी कामासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले प्रेम (१२) आणि कार्तिक (६) घरीच होती.
 
 दरम्यान घरात खेळत असताना मोठा मुलगा प्रेम याला घराच्या दरवाजाला लावलेल्या साडीच्या पदराचा फास लागल्याने त्याचा मृत्यू झाला. थोड्या वेळाने आई - वडील घरी आल्यावर त्यांनी समोरील दृश्य पाहून एकच हंबरडा फोडला. नांदुरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.