धक्कादायक! मोताळा बसस्टॅन्ड वरून १२ वीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण! मोताळ्याच्या बबनराव विद्यालयात शिकत होती; शिंबरे सरांना द्यायला ७ हजार रुपये घेऊन गेली होती !

 
kraim

मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मोताळा बस स्टँड वरून १२ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बोराखेडी पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी अपहरणाची तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

       जाहिरात👇
jhavar
नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी मोताळा येथील बबनराव महाविद्यालयात १२ व्या वर्गात शिकते. दररोज गावातील मैत्रिणीच्या  एसटीने मोताळा येथे जात असते. ७ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे  ती मोताळा येथे गेली होती.  शिकवणीचे पैसे शिंबरे सरांना देण्यासाठी तिने आजोबांकडून ७ हजार रुपये घेतले होते . दरम्यान संध्याकाळी तिच्या मैत्रिणी घरी परतल्या मात्र ती घरी परतली नाही.

सकाळी आम्ही सगळ्या जणी एसटी बस मधून मोताळा बस स्टँड वर उतरलो. आम्ही कॉलेज मध्ये गेलो मात्र ती बसस्टँडवरच थांबली असे तिच्या मैत्रिणींनी सांगितले. मुलीच्या आईवडिलांनी तिचा सगळीकडे शोध घेऊनही ती न सापडल्याने बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.