शेगाव हादरले! आधी पत्नीने घेतला गळफास! व्यथित झालेल्या पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न...!

 
ghynhg
शेगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहून व्यथित झालेल्या पतीने पत्नीशेजारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पती गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज, ३१ मे रोजी शेगाव शहरातील आळसना रोडवरील एस टी डेपो मागे संध्याकाळी घडली.
प्राप्त माहितीनुसार मूळचे नांदुरा तालुक्यातील अवधा येतील कैलास  ढोले हे कुटुंबासह शेगावात राहतात. त्यांचा माऊली भोजनालय नावाने मेस व किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. यासोबतच संसाराचा गाडा चालविण्यासाठी कैलास ढोले हे ऑटोरिक्षा चालवतात. त्यांना दोन मुली असून एकीचे वय १२ तर दुसरीचे १४ वर्षांचे आहे. आज, ३१ मे रोजी सायंकाळी संध्याकाळी कैलास ढोले यांची पत्नी रेणुका ढोले(४०)  यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. घटनेची माहिती ढोले यांना कळताच ते घरी आले आणि पत्नीला मृतावस्थेत पाहून पत्नीच्या शेजारीच दोरी बांधून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तेव्हढ्यात परिसरातील लोकांनी त्यांना फासावरून उतरवले त्यांना लगेच उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला रेफर करण्यात आले आहे. कैलास ढोले यांच्या पत्नीने आत्महत्या का केली याचे कारण समोर येऊ शकले नाही. याप्रकरणाचा तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत.