ती अंगणात तिच्या आईजवळ झोपली होती; तो आला अन्...! खामगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

 
kraim
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंगणात आईजवळ झोपलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. २४ मे च्या ११ वाजेदरम्यान  खामगाव तालुक्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाळा असल्याने खामगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत अंगणात झोपली होती. रात्री ११ च्या सुमारास संशयित तरुण  अजय राजू बोडदे तिथे आला. आईजवळ झोपलेल्या मुलीसोबत त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र आवाज केल्याने तिची आई झोपेतून उठली. तिने आरडाओरड केल्याने संशयित आरोपीने पळ काढला. खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अजय बोदडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.