तिने त्याच्याविरुध्द विनयभंगाची तक्रार दिली! अपमान सहन न झाल्याने त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी मारली; नांदुऱ्याची घटना

 
relve
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विनयभंगाची तक्रार दिल्याने अपमान सहन न झाल्याने युवकाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली.
शेगाव लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सुनील ओंकार भिडे(३७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

 सुनील भिडे याच्याविरुद्ध डिगांबर वराडे, अशोक भिसे व एका महिलेने संगनमत करून विनयभंगाची खोटी तक्रार दिली होती असे सुनील भिडे याच्या पत्नी निमाबाई यांचे म्हणणे आहे. याप्रकरामुळे अपमान झाल्याची भावना सुनील भिडे याच्या मनात होती, त्यामुळे त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात "त्या" महिलेसह डिगांबर वराडे, अशोक भिसे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.