STATE NEWS हे देवा! एव्हढा निष्ठुर कसा झाला रे? ३ कोवळ्या मुलींसह आईचाही मृत्यू! कपडे धुण्यासाठी गेल्या अन् चौघी तलावात बुडाल्या
सांगली( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. तलावात बुडून ३ कोवळ्या मुलींसह त्यांच्या आईचा देखील मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तलावातून चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ज्या तलावात हे मृतदेह आढळले त्या तलावाच्या काठावर कपडे धुण्याचे साबण आणि कपडे सुध्दा आढळले आहेत.
जाहिरात 👇
जत तालुक्यातील बिळूळ गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. जत येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयात चौघींचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. सुनिता माळी, आश्र्विनी माळी, ऐश्वर्या माळी, अमृता माळी अशी मृतकांची नावे आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार मृतक सुनीता माळी या तीन मुलींसह घराजवळच्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेला होता. मात्र एकाचवेळी चौघी तलावात कशा बुडाल्या याबद्दल पोलिसांनाही प्रश्न निर्माण झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून वेगवान तपास करण्यात येत आहे.