एसटी बसने मोटरसायकलला उडवले!; महिला जागीच ठार, मुलगा गंभीर; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

 
bus
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव एसटी बसने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला. आज, २८ एप्रिलला दुपारी सव्वातीनच्या सुमारास बिबी- चिखली रस्त्यावरील सावखेड नागरे गावाजवळ हा अपघात झाला.
छाया सुरेश सोनकांबळे (४२, रा. सोनोशी वर्दडी, ता. सिंदखेड राजा) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून, तिचा मुलगा शुभम (२२) गंभीर जखमी झाला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, छाया कांबळे व त्‍यांचा मुलगा मोटारसायकलीने पाडळी शिंदे येथून सोनोशीकडे जात होते. त्याच वेळी चिखली आगाराची बस बिबीकडून चिखलीकडे जात होती. सावखेड नागरे गावाजवळ एसटी बसने मोटरसायकलला धडक दिली. घटनास्थळावरील नागरिकांनी जखमी मुलाला रुग्णालयात हलवले असून, अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.