भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडले!१ जागीच ठार, १ गंभीर! मलकापूर तालुक्यातील घटनामलकापूर

 
ytt
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव कंटेनरने दुचाकीला उडवल्याने १ जन जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. मलकापूर नांदुरा रस्त्यावर वडनेर पुलावा जवळ हा अपघात झाला. गोपाल संजय सातव (२८, रा.वाघुड ता.मलकापूर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार गोपाल त्याचा मित्र सुनील मधुकर सातव(३८,रा.वाघुड) याच्यासह दुचाकीने लग्नासाठी नांदुऱ्याकडे जात होते. वडनेर पुलावरील वळणाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात गोपालच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सुनीलच्या हाताला व पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक व वाहक पसार झाले. गंभीर जखमी सुनील वर उपचार सुरू आहेत.