इन्स्टाग्राम चालवतात? सावध व्हा! बुलडाण्याच्या सुमेध सोबत जे घडल ते तुमच्यासोबतही होऊ शकत..!
Sep 23, 2022, 15:39 IST

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांच्या फसवणूक झाल्याच्या घटना घडत आहेत. अनेकदा फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरील खाते हॅक करून पैशांची मागणी करण्याचे किंवा रिकामा उपद्रव करण्याच्या घटना घडतात. सुंदरखेड येथील सुमेध गजानन सरदार याचे इंस्टाग्राम खाते हॅक करून त्याच्या इतर मित्रांना शिव्या देण्याच्या उपद्व्याप एका अज्ञात व्यक्तीने केलाय. सुमेधच्या वडिलांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली आहे.
गजानन त्र्यंबक सरदार (४५, सुंदरखेड) यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की, त्यांचा मुलगा सुमेध गजानन सरदार याचे इन्स्टाग्रामचे अकाऊंट अज्ञाताने हॅक करून मित्र यादीतील व्यक्तींना मॅसेजद्वारे शिवीगाळ करीत आहे. अशा तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञाता व्यक्ती विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.