उभ्या कारची काच फोडून लुटले! अमडापूर जवळची घटना; ५ आरोपींना LCB ने ठोकल्या बेड्या!

 
hygyy
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अमडापूर पोलीस ठाण्या अंतर्गत रस्त्यावर थांबलेल्या स्विफ्ट डिझायर कारचे काच फोडून, चाकूचा धाक दाखवून मोबाईल सह रोख रक्कम लांबविणाऱ्या ५ आरोपींना बुलडाणा एलसीबी पथकाने सीसीटीव्ही  फुटेजच्या आधारे जेरबंद केले आहे.

अमडापूर रोडवरील पेठ शिवारात ११ डिसेंबर रोजी  प्रशांत अशोक वाकीकर (रा.खामगाव) यांच्या उभ्या स्विफ्ट डिझायर कारचे काच फोडून चाकूचा धाक दाखवून एक मोबाईल व २५०० रुपये हिसकावून ५ आरोपी पळून गेले होते. याबाबत फिर्यादींनी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरविले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासणीच्या आधारे पाचही आरोपींना गुन्ह्यामध्ये वापरलेल्या वाहन व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. सतीश शंकर गायकवाड (२८, रा. सवासणी ता.जाफराबाद जि. जालना) परसराम सिद्धू जाधव ( २५रा. सवासणी ता. जाफराबाद जि. जालना) वैभव गजानन गावंडे (२१,रा. भराडखेडा ता. जाफराबाद जि.जालना) कृष्णा भगवान भोपळे (२२रा. सोनगिरी ता.जाफराबाद जि जालना) गजानन रामप्रसाद प्रसाने (२१ रा.डोलखेड ता. जाफराबाद जि जालना) असे  अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख बळीराम गिते यांच्या आदेशानुसार सपोनि अमित वानखेडे,सपोनि मनिष गावंडे,सपोनि विलासकुमार सानप,
पोउपनि श्रीकांत जिंदमवार,
पोहेका सुधाकर काळे,पोना सुनील खरात,दिनेश बकाले, पुरुषोत्तम आघाव, अनंता फरताळे, वैभव मगर,
सचिन जाधव, मधुकर रगड यांनी केली.