विवाहितेचा विनयभंग! आरोपी म्हणे, कोर्टाला काहीएक समजत नाही; सिंदखेडराजा तालुक्यातील मोहाडीच्या बापलेकांविरुध्द गुन्हा दाखल

जाहिरात☝️
तक्रारीनुसार पीडित महिलेच्या घरासमोरच महिलेचा एक प्लॉट आहे. त्यावरून गावातील उत्तम राजाराम इंगळे याच्यासोबतच वाद असून प्रकरण सध्या न्यायालयात आहे. २३ नोव्हेंबरला महिला घरासमोर काम करीत होती, त्यावेळी उत्तम इंगळे हा "त्या" प्लॉट मध्ये एंगल गाडु लागला. महिलेने प्लॉट बद्दल कोर्टात वाद सुरू असल्याचे सांगितले असता, कोर्टाला काहीएक समजत नाही,हा माझा प्लॉट आहे असे म्हणून उत्तम इंगळे याने महिलेला शिवीगाळ केली.ओट्यावरील भांडे, बकेट फेकून दिली.
महिला भांडे धरायला गेली असता उत्तम इंगळे याने महिलेला पकडुन तोंडावर बुक्की मारली, हात व खांदा धरून छेडछाड केली. यावेळी उत्तम इंगळे याचा मुलगा उमेश उत्तम इंगळे यानेसुद्धा मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. असे तक्रारीत म्हटले आहे.तक्रारीवरून उत्तम राजाराम इंगळे व त्याचा मुलगा उमेश उत्तम इंगळे अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.