एसटी बस मध्ये राडा; जळगाव जा.तालुक्यातील खांडवीच्या ६ पोरांची दादागिरी; १२ वीत शिकणाऱ्या ६ मुलींच्या अंगावर टाकला हात,

 
hyfg
जळगाव जामोद( ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी बस स्टॉप वर काल,१६ डिसेंबरच्या संध्याकाळी चांगलाच राडा झाला. खांडवी येथील ६ तरुणांनी एसटी बसमध्ये चढून मुलींची छेड काढली, एवढेच नव्हे तर मुलींना मारहाणही केली. मुली जळगाव जामोद येथील  एस  के.के कॉलेज मध्ये शिकतात. त्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथून एसटी बसणे जाणे येणे करतात. दरम्यान मुलीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी खांडवी येथील ६ जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथून काही मुली व मुले जळगाव जामोद येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जळगाव जामोद बस डेपोच्या वतीने जळगाव जामोद ते वडोदा अशी बस सेवा सुरू केली आहे. दरम्यान काल, सायंकाळी वडोदा येथील मुली आणि मुले बस मध्ये बसून वडोदा येथे जात होते. बस खांडवी स्टॉपवर थांबली असता तेथील ६ तरुण गाडीत चढले.त्या ६ जणांनी वडोदा येथील धनेश सुनील फुसे याला मारहाण करायला सुरुवात केली, त्याचवेळी गाडीत बसलेल्या वडोदा गावच्या मुलींनी त्या ६ जणांना हटकले असता, त्या ६ पोरांनी मोर्चा मुलींकडे वळवला. मुलींची छेड काढली, त्यांचे केस व ओढण्या ओढल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.तक्रारीवरून खांडवी येथील विशाल डोंगरदिवे, अजय डोंगरदिवे, रोशन पंढरी डोंगरदिवे, विकास साहेबराव डोंगरदिवे याच्यासह दोन अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 मुलींना सातत्याने होतोय त्रास...!

दरम्यान या मुलींना टवाळखोर मुले सातत्याने त्रास देत असल्याचे समोर येत आहे. काही मुले कारण नसतांना त्या एसटी बसने प्रवास करतात असेही सांगण्यात येत आहे. जळगाव जामोद बस स्टँड वर सायंकाळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज असल्याची मागणी जोर धरत आहे.