आधी केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गाडीवर बस म्हणे, नंतर तरुणाने घेतले विष ! मलकापूर तालुक्यातील घटना

 
kraim
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपी तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मलकापूर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. शुभम राजेंद्र गावंडे(२६) असे तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

२७ डिसेंबरला शुभमने गावातीलच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. त्याने जबरदस्तीने मुलीला गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने घडला प्रकार आईवडिलांना सांगितल्यानंतर मुलीच्या वडिलांनी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

तक्रारीवरून शुभम विरुद्ध पोस्को सह गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आपल्याला अटक करतील ही भीती शुभमला होती. दरम्यान काल, ३१ डिसेंबरच्या पहाटे त्याने घरातील विषारी औषध प्राशन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.