शिक्षकदिनाच्या दिवशीच मुख्याध्यापकाचे पाप! अभ्यास घेतो म्हणत विद्यार्थिनीला खोलीत बोलावले, छातीवर फिरवला हात, मांडीवर बसवून पप्पी घेतली!

 वासनांध मुख्याध्यापकाविरुध्द गुन्हा दाखल! नांदुरा तालुक्यातील धक्कादायक घटना
 
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिक्षकदिनाच्या पवित्र दिवशी नांदुरा तालुक्यातील मुरंबा येथे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे काम जिल्हा परिषदेच्या मुख्यद्यापकाने केले. आपल्या विद्यार्थिनीला मुख्याध्यापक कक्षात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले. तिच्या छातीवरून वाईट उद्देशाने हात फिरवला. मांडीवर बसवून पप्पी घेतली. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली. अखेर आज, ६ सप्टेंबर रोजी या वासनांध शिक्षका विरुद्ध पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. देविदास जानराव डिगोळे (५४, रा.शेगाव) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीगोळे मुरंबा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहे. पिडीत मुलगी त्याच शाळेत पाचव्या वर्गात शिकते. काल , ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता डीगोळे ने मुलीला त्याच्या खोलित बोलावले. तुझा अभ्यास पहायचा आहे, तू अभ्यास का केला नाही? तुला आता मी शिक्षा करणार असे डीगोळे मुलीला म्हणाला. त्यावर तिने घाबरून असे करू नका सर असे म्हटले असता तू शांत बस असे म्हणत वासनांध मास्तरने वाईट उद्देशाने मुलीच्या छातीवरून हात फिरवला.

तिला मांडीवर बसवत तिची पप्पी घेतली. मुलीने असे करू नका सर असे म्हटले असता तू जर कुणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली. शाळा सुटल्यावर पीडित मुलीने तिच्या वडिलांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर आज , मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास  ठाणेदार सतीश आडे करीत आहेत.