पोलिसांना मिळाली फसवणुकीच्या आरोपींची 'दिशा'; बडे भामटे बुलडाणा शहर पोलिसांच्या ताब्यात! जिल्ह्यातल्या १५० लोकांना २५ लाखांनी गंडविले; तर इतरांच्या २ कोटींना लावला होता चुना

दिशा मार्केटिंग कंपनीच्या नावाखाली ८ हजार ५०० रुपये भरा व सदस्य जोडा अशा साखळी योजनाचे जाळे संजय दुसाने ठाणे आणि मनोज पवार नाशिक या दोघांनी राज्यभरात पसरविले. बुलडाणा जिल्ह्यातील १५० लोकांची २५ लाखांनी तर या गुन्ह्याआधी नाशिक अंबड येथे
त्यांनी १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा आहे. तसेच नवघर पोलीस ठाण्यात देखील १ कोटी ३५ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तेथे आरोपींना अटक सुद्धा झाली. परंतु जामीनावर सुटका होताच त्यांनी बुलडाणा जिल्ह्याकडे मोर्चा वळविला. आरोपींनी जिल्ह्यात फसवणूक केल्याप्रकरणी सन २०१९ मध्ये शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपी तेव्हापासून फार होते. दरम्यान बुलडाणा पोलिसांना तपासाची दिशा मिळाल्याने अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी नाशिक येथे जाऊन दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली.