चिखली तालुक्यातील लोक सोनाराच्या दुकानांत गर्दी करत आहेत! अंगावर दागिने घालण्याची हौस असणाऱ्या महिल्या म्हणतात नको रे बाबा, काढून ठेवलेले परवडले! का घडतंय असं, वाचा....

 
fsdg
चिखली( अनंता काशीकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दागिने घालायला कोणत्या महिलांना आवडणार नाही..मात्र आता याच महिलांना अंगावरील दागिने नकोसे वाटू लागलेय.. चिखलीच्या सोनाराच्या दुकानात दागिने ठेवण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. तर काही जण बँकांमध्ये सोने गहाण ठेवत आहेत. अस एकाएकी का होतंय असं कुणालाही वाटेल..मात्र हे सगळ घडतय चोरांच्या भीतीने..! हो, कारण गेल्या काही दिवसांपासून चिखली तालुक्यातील विविध गावांमध्ये चोरट्यांनी हैदोस घातलाय. आम्ही बघितले, आम्ही बघितले असे अनेक जणांनी आतापर्यंत सांगितले असले तरी त्या चोरट्यांना रंगेहाथ पकडण्याची हिम्मत मात्र अजून नागरिकांनीच काय तर पोलिसांनी सुद्धा दाखवली नाही.

अंढेरा, अमडापुर, आणि चिखली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. काही गावांत तर चोरांच्या भीतीने नागरिकांनीच जागून गस्त घालने सुरू केले आहे. यांनी, बघितला, त्यांनी बघितला ,दोन जण होते, पाच जण होते अशा चर्चा गावागावात रंगत असल्या तरी चोरांना रंगेहाथ पकडण्यात कुणालाही यश आले नाही.  गेल्या महिनाभरात चिखली तालुक्यातील अनेक गावांत छोट्या मोठ्या चोऱ्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात सोन्याच्या दागिन्यांनापासून ,रोख रक्कम तर काही घरातील फ्रिज मधील अन्न पदार्थांवर चोरट्यांनी ताव मारल्याच्या घटना घडल्या आहेत. 
  
अंगावर दागिने नको रे बाप्पा..!

दरम्यान चोरट्यांचा ऐकीव धुमाकूळ पाहता नागरिकांनी घरातील दागिने , महिलांच्या अंगावरील दागिने सोनारांकडे तर काहींनी बँकात गहाण ठेवणे सुरू केले आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यापेंक्षा दागिने गहाण ठेवण्यासाठी सोनाराच्या दुकानात गर्दी होत असल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले.