मेहकरातील मिलिंद नगरातील पवन आराख आणि छोट्या इमामवाड्यातील मोहम्मद नवाजचा बडा कारनामा! मी तुला लाईक करतो म्हणत १५ वर्षीय मुलीची छेड काढली..!

 
kraim
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांनी मेहकर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 मेहकर शहरातील मिलिंद नगरातील पवन संतोष आराख आणि छोटा इमामवाड्यातील मोहमद नवाज या दोघांनी मिळून १५ वर्षीय मुलीची छेडखानी केली. मेहकर शहरातील शीतल अकॅडमी च्या आवारात हा प्रकार घडला. तू माझ्यासोबत बोलत का नाही, दुसऱ्या मुलांसोबत का बोलते, मी तुझ्या घरी येतो असे म्हणत पवन आराख आणि मोहम्मद नवाज याने मुलीचा हात ओढत छेड काढली. याआधी दोघांनी मिळून तुला लाईक करतो असे म्हणत छेड काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.