परवेज सौदागर ची हिम्मत वाढली! शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून प्रपोज! तिच्या वडिलांनी जाब विचारल्यावर त्यांनाही बेदम मारले! चिखली तालुक्यातील घटना
Sep 18, 2022, 11:14 IST

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या परवेज शहवाज सौदागर विरुद्ध अमडापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात ही १६ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी काल, तक्रार देण्यात आली.
अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील शाळकरी मुलगी शाळेत जात होती. त्यावेळी धोत्रा नाईक येथील परवेज शहवाज सौदागर याने तिचा पाठलाग केला. यासोबतच असभ्य भाषेत बोलून तिचा विनयभंग केला. पिडीत मुलीने जेव्हा घडलेला प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला तेव्हा मुलीच्या वडिलांनी परवेज च्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. मात्र त्याची हिम्मत एवढी वाढली की त्याने पिडीत मुलीच्या वडिलांना सुद्धा काठीने बेदम मारहाण केली. अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली आहे.