पालकांनो तुमच्या मुलींना सांभाळा! जिल्ह्यात मुलींना चोरणारी टोळी? मोताळा तालुक्यातल्या कोल्ही गवळीच्या अकरावीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण!

चिखलीच्या मेरा बु येथून अल्पवयीन मुलगी शाळेच्या गेटजवळून झाली गायब
 
 
kkkk
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण करणारी एखादी टोळी तर जिल्ह्यात सक्रिय ना अशा चर्चा आता गावोगावी सुरू झाल्यात. त्याला कारणही तसेच असून गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढल्या आहेत. या मुली पुढे कुठे जातात? त्यांना कुठल्या विचित्र व्यवसायात तर ढकलल्या जात नाही ना असा प्रश्नही उपस्थित होत असून पोलिसांनी जरा अधिक गांभीर्याने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. काल, १२ सप्टेंबरला मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोल्ही गवळी येथून अकरावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. तर चिखली तालुक्यातील मेरा बु येथील श्री .शिवाजी विद्यालयाच्या शाळेच्या गेटवरून अल्पवयीन मुलगी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

 दोन दिवसांपूर्वी संग्रामपूरात एका शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र मुलीने अपहरण करणाऱ्या महिलेच्या हाताला चावा घेत स्वतःची सुटका करून घेतली होती.दरम्यान तशीच टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोल्ही गवळी येथील अपहरण झालेल्या मुलीच्या आईने धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मुलीची आई शेतात गेलेली होती, संध्याकाळी घरी परतली तेव्हा मुलगी घरी नव्हती. मोठ्या बहिणीने ती दुपारी १ पासून गायब असल्याचे सांगितले. त्यामुळे माझ्या लेकीचे कुणीतरी अपहरण केले असावे असा संशय मुलीच्या आईने तक्रारीत व्यक्त केलाय. चिखली तालुक्यातील मेरा बु येथील शिवाजी विद्यालयात शिकणारी मुलगी मैत्रिणींसोबत शाळेत गेली. शाळेच्या गेटवरून तिच्या मैत्रिणी वर्गात गेल्या ती मात्र वर्गात पोहचली नाही. त्यामुळे शाळेच्या गेटवरून तिचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार अंढेरा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.