ऑनलाईन कर्ज घेणाऱ्या पोट्टयाहो, जपून रे बावा! तोंड दाखवायची लाज वाटेल..!खामगावच्या पोरासोबत वाचा काय घडल!

 
onlin
खामगाव ( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): इंटरनेटच्या जाळ्यामुळे आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले, आणि बरेचसे कामे सोपे झाले. वेळे वाचला मात्र या सर्व बाबींचा काही जण गैरफायदा घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने अनेकांची फसवणूक करत असतात. याच्या बातम्या आपण वाचत आलोय ऐकत आलोय. असाच एक धक्कादाय प्रकार खामगाव तालुक्यात समोर आला आहे. यामध्ये ऑनलाईन कर्ज देऊन आता त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जाते आहे. 

 खामगाव तालुक्यातील बोरी - अडगाव येथील एका तरुणाला सुमारे दोनेक आठवड्या पूर्वी एक टेक्स्ट मेसेज आला. त्याने त्यामध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक केल्याने 'नमस्ते कॅश' नावाचे ॲप डाऊनलोड झाले. आणि न मागता  त्याच्या खात्यात दोन वेळा ३ हजार व पुन्हा ३ हजार असे ६ हजार कर्ज देण्यात आले. मात्र प्रत्यक्षपणे त्यांच्या खात्यात तीन हजार तीनशे रुपये जमा करण्यात आले व 2700 प्रोसेसिंग फी साठी कट करण्यात आल्याचे त्याला सांगण्यात आलं.  तुम्ही सहा हजार रुपये भरा नाहीतर आम्ही तुमचा मोबाईल हॅक केलेला आहे. तुमच्या मोबाईल मधील  सगळे फोटो  पूर्ण हॅक केले आहे.

त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने ६००० रुपये कर्ज भरले. मात्र त्यांना आता व्हाट्सअप कॉल करून हजारो रुपयाची मागणी केली जात आहे. अन्यथा मोबाईल मधील संपूर्ण डेटा हॅक केला आहे. आणि आम्ही तुमचे अश्लील फोटो तुमच्या मोबाईल मधील कॉन्टॅक्ट नंबर वर पाठवणार असल्याच्या धमक्या त्यांना येत आहेत. यापूर्वीही बुलडाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथे एका व्यक्तीचे फोटो एडिट करून त्यांचे अश्लील फोटो तयार करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

त्यामुळे या पीडित तरुणाने  या ॲप संदर्भात सायबर सेल, महाराष्ट्र शासनाचे माहिती व तंत्रज्ञान व अनेक कंनझ्यूमर हेल्पलाइन वर ऑनलाईन तक्रार केली आहे. आपणही अशा ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप पासून सावधान रहावे. आपल्यालाही ब्लॅकमेल केले जाऊ शकते. आपलेही अश्लील फोटो तयार करून अशाप्रकारे व्हायरल केले जाऊ शकतात, आणि असा प्रकार आपल्या सोबत घडत असेल किंवा घडला असेल तर सायबर सेल माहिती व तंत्रज्ञान व कंझ्यूमर हेल्पलाइन वर तक्रार करू शकता.