सासुकडे एक जण नेहमी यायचा! सुनेन विचारलं काय भानगड? समोर जे घडल ते धक्कादायक; चिखली पोलीस ठाण्यात तक्रार

पिडीत विवाहितेचे लग्न २०१७ मध्ये झाले होते. तिच्या पतीने हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स केला आहे.दरम्यान विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या सासुकडे गावातील एक व्यक्ती नेहमी यायचा. हा व्यक्ती आपल्या घरी वारंवार का येतो अशी विचारणा सुनेने सासुकडे केल्यावर सासू चांगलीच संतापली. तुला काय त्याचे घेणे देणे, कशाला नाक खुपसतेस
असे सासू तिला म्हणाली. तेव्हापासून विवाहितेच्या पतीला सासूने तिच्याबद्दल भडकावून दिले. तिचा सगळे मिळून छळ करू लागले असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तिला कामधंदा येत नाही, ती बाहेर कुणाशीतरी फोनवर बोलत राहते असे तिच्याबद्दल घरातले बोलत होते. वडिलांकडून घरखर्चासाठी २ लाख रुपये घेऊन ये असा तगादा तिच्याभोवती लावण्यात येत होता असेही तिने तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीवरून तिचा पती, सासूसह ७ जणांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.