गांगलगावच्या खुनाचे गूढ उकलले!; बायको सोबत राहत नसल्याने तरुणासोबतच अनैसर्गिक कृत्य! विरोध केल्यावर दाबला गळा, नंतर कचऱ्यात फेकून पेटवून दिले; चिखलीचा रशीद गजाआड

 
tyuj
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गांगलगाव( ता.चिखली) येथील एका मंदिराच्या मागे १० मे रोजी एका तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. मंदिराच्या बांधकामावर मजुरीसाठी आलेल्या शिवाजी बोबडे (३०) नामक तरुणाचा तो मृतदेह असल्याचे सांगितल्या जात असेल तरी तो नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळाली नव्हती. दरम्यान पोलीसांनी त्याची ओळख पटविण्याचे आवाहन केल्यानंतर त्याची ओळख पटली असून त्याच्या खुनाचे खळबळजनक कारण समोर आले आहे. घटनेच्या दिवशी संशयीत म्हणून ताब्यात घेतलेल्या चिखलीच्या राशीदनेच त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. ९ मे च्या रात्री दोघे सोबत झोपले होते..दोघांच्याही बायका त्यांच्यासोबत राहत नसल्याने राशीद ने स्वतःची शारीरिक भूक भागविण्यासाठी शिवाजी बोबडे याच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवाजी बोबडे याने विरोध केल्याने रागाच्या घरात त्याचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मंदिरामागे कचऱ्याच्या ढिगारात फेकून त्याला पेटवून दिले.

अंढेरा पोलीस मृतकाची ओळख पटवत असतांना अकोला, बुलडाणा , वाशिम या तीन जिल्ह्यात शिवाजी बोबडे नावाचे १२ व्यक्ती आढळले. मात्र एकाचेही मृतकासोबतचे वर्णन जुळले नाही. दरम्यान पोलीसांना अकोल्यावरून एका शिक्षकाचा फोन आला त्यांनी मृतकाला ओळखत असल्याचे सांगितले. मृतकाची सासुरवाडी किनगाव जट्टू असून तो मूळचा औरंगाबादच्या चित्तेगाव येथील राहणारा आहे . मात्र तो सासुरवाडीत राहत असल्याचे सांगितले. पोलीसांनी किनगाव जट्टू येथे विचारपूस करून फोटो दाखवले असता सासऱ्याने तो आपला जावई असल्याचे सांगितले मात्र तो मुलीला आणि मुलांना सोडून गेल्याचे सांगितले.

गांगलगाव येथील मंदिरावर बांधकाम करीत असलेल्या राशीदने चिखलीच्या बसस्टँडवर कामाच्या शोधात असलेल्या शिवाजी बोबडेला गांगलगाव येथे आणले होते. राशीदची बायको त्याच्याजवळ राहत नसल्याने तो कामाच्या ठिकाणीच मुक्कामी राहत होता. राशीदची आधीच गांगलगावात ओळख असल्याने त्याने शिवाजी बोबडे याची दुकानदाराशी ओळख करून देत उधारीचे खाते लावून दिले होते. दोघेही मंदिर परिसरात राहत होते. दरम्यान ९ मे च्या रात्री राशीदने शिवाजी बोबडे याच्यासोबत अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केला. बोबडेने विरोध केल्याने रागाच्या भरात राशीदने त्याचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मंदिराच्या मागच्या बाजूला कचऱ्यात टाकून पेटवून दिल्याची कबुली राशीद ने अंढेरा पोलीसांना दिली.