लेकीला वाचविण्यासाठी आईची विहिरीत उडी! आईचा मृत्यू ,मुलगी बचावली; खामगाव तालुक्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

 
htgg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  लेकीला वाचवण्यासाठी आईने चक्क विहिरीत उडी घेतली. परंतु मुलगी वाचली असून दुर्दैवाने आईचा मृत्यू झाला. ही बाब दुर्दैवी असली तरी, या घटनेने आई आणि लेकीचे नाते किती घट्ट असते हे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील कोटी येथे घडली. बेबीताई खताळ (४०) असे मृत आईचे नाव आहे.

     shelke

          (जाहिरात👆)

खामगाव तालुक्यातील कोटी येथील खताळ  कुटुंब हे शेती आणि मेंढी पालनाचा व्यवसाय करते. शेताच्या जवळच झोपडी बांधून राहतात. बेबीताई या आपल्या दहावीत शिकणाऱ्या मुलीला घेऊन शेतावर फेरफटका मारायला गेल्या. दरम्यान १४  वर्षीय आकांक्षा  ही विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेली असता अचानक तिचा तोल जाऊन ती पाण्यात पडली.

मुलगी पाण्यात पडल्याचे लक्षात येताच आई बेबीबाईने मुलीला पाण्यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला.परंतु मुलगी पाण्यात खोलवर बुडत असल्याचे पाहून  कुठलाही विचार न करता त्यांनी विहिरीत उडी घेतली. पाणी खोल असल्यामुळे त्या पाण्याच्या तळाशी गेल्या. मात्र त्यांचा बुडून मृत्यू झाला तर मुलगी आकांशाने विहिरीतील कडा पकडून ठेवल्याने ती सुदैवाने वाचली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.