लग्न होऊन झाले होते केवळ ७ महिने! शेगाव तालुक्यातील डोलारखेडच्या लेकीने जीव गमावला ! नवऱ्याचा प्रताप वाचून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल..

निकिताचा भाऊ शुभमने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार निकिताचा विवाह २०२२ च्या एप्रिल महिन्यात अकोला जिल्ह्यातील हाता येथील गणेश गावंडे याच्याशी झाला होता. निकिताचे वडील वारलेले असल्याने निकिताच्या मोठ्या वडिलांनीच तिचा विवाह लावून दिला होता. मात्र लग्नानंतर निकिताच्या सासरकडील मंडळींनी तिला प्रचंड त्रास देणे सुरू केले. माहेरवरून ६ लाख रुपये आणण्यासाठी तिच्याभोवती तगादा लावण्यात होता. तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सासरच्या मंडळींनी सुरू केले. निकिताचा पती गणेश हा पैशाच्या मागणीसाठी निकिताला मारहाण करीत होता .
सुखी संसाराची स्वप्ने पाहिलेल्या निकिताच्या वाट्याला मात्र सुख आलेच नाही. अखेर नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. निकिताचा भाऊ शुभमने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून निकिताच्या पती, सासू सासरे यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.