मलकापूरचा चिंट्या निघाला मोठा करामती; आई वडिलांजवळ झोपलेली पोरगी केली गायब! नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील घटना

 
borakhedi
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर येथे राहणारा चिंटू शिंदे भलताच करामती निघाला. नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घेऊन तो पसार झाला. मुलीच्या वडिलांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चिंट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या  वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार ,मुलीचे वडील शेती करतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लहानी मुलगी शेंबा येथील एका महाविद्यालयात १२ व्या वर्गात शिकते. २८ ऑक्टोबरच्या रात्री लहान मुलगी घरात झोपली होती. दरम्यान २९ ऑक्टोबरच्या सकाळी ४ वाजता मुलीच्या वडिलांना जाग आली तेव्हा मुलगी दिसली नाही. सगळीकडे शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. सावळा रंग, पाच फूट उंची, काळे केस, अंगात  मेहंदी रंगाचा टॉप अशा वर्णनाची मुलगी मलकापूर येथील चिंटू शिंदे या तरुणाने पळवून नेल्याची मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे. चिंट्यावर संशय असल्याने चिंट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.