मलकापूरची ऐश्वर्या गायब झाली पण, खरे समोर आल्यावर कुटुंबीयांना धक्काच बसला..!

 
garl
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दरवर्षी दिवाळी झाली की लग्नाळू मुली बेपत्ता होण्याच्या घटना आणखी वाढतात. बुलडाणा जिल्ह्यात तर अलीकडच्या काळात मुली बेपत्ता होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दरम्यान मलकापूर येथील एक २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आलाय.

ऐश्वर्या संदीप चतुर असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. घरातून कुणाला काहीही न सांगता ती गायब झाली. तिचा आजूबाजूला, नातेवाईकांकडे, मैत्रिणीकडे शोध घेऊनही ऐश्वर्या सापडली नाही. अखेर तिच्या कुटुंबीयांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन मुलीचा शोध घेण्याची विनंती केली. दरम्यान ऐश्वर्या ने लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.