मलकापूर शहर आणि लोणार पोलीस ठाण्याला नवे ठाणेदार! विजयसिंह राजपूत लोणार तर अशोक रत्नपारखी मलकापूर शहरचे कारभारी..!

 
vguj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस दलात नुकतेच बदली सत्र राबविले.१० जानेवारीला झालेल्या आस्थापना मंडळाच्या बैठकीत आणखी २ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ प्रमाणे महाराष्ट्र पोलीस सुधारणा अध्यादेश २०१५ मधील प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हा पोलीस दल आस्थापना मंडळाची १० जानेवारीला बैठक घेण्यात आली. या बैठकीतील निर्णयानुसार, बुलडाणा नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांची मलकापूर शहर पोलीस ठाण्यात ठाणेदार पदी तात्पुरत्या स्वरूपात पदस्थापना करण्यात आली आहे.

तसेच मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय सिंग राजपूत यांची बदली लोणार पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी करण्यात आली. या बदली या आदेशावर एसपी सारंग आवाड यांची स्वाक्षरी आहे.