खासदार प्रतापराव जाधवांच्या मादणीत जळक्या माणसाची विकृती! दुसऱ्याच चांगल दिसत नव्हत म्हणून काय केलं वाचा...

 
dongav
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खासदार प्रतापराव जाधवांचे गाव असलेल्या मादणी गावात एका जळक्या प्रवृत्तीच्या विकृत माणसाचा कारनामा समोर आला आहे. शेतात उभ्या केलेल्या सोयाबीनच्या सुडीला या जळक्या माणसाने आग लावून सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान केले आहे.

 १२ ऑक्टोबरच्या रात्री ही घटना घडली. डोणगाव येथील  यशोदाबाई  उत्तम खोडकर यांचे मादणी शिवारात  शेत आहे. त्या शेतात सोयाबीन सोंगुन सुडी लावून ताडपत्रीने झाकून ठेवली होती. काल, १३ ऑक्टोबरला त्या शेतात सोयाबीनची सुडी काढण्यासाठी शेतात गेल्या असता सोयाबीन ची सुडी कुणीतरी जाळून टाकल्याचे त्यांना दिसून आले. या सुडीवर ठेवण्यात आलेली ताडपत्री, १० स्प्रिंकलर असे २ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान जळका एवढ्यावर थांबला नाही, त्याने दुसऱ्या सुडीला ही आग लागली,मात्र ती सुडी ओली असल्याने अर्धवट जळाली.
 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तक्रारीवरून डोणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात जळक्या वृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्या जळक्या ला सुडी पेटवून कोणता विकृत आनंद मिळाला असेल ? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.